#

Advertisement

Sunday, March 22, 2026, March 22, 2026 WIB
Last Updated 2026-03-22T17:43:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणारच !

Advertisement

वर्धा येथे बहुजन रयत परिषदेचे विदर्भ जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे यांनी केले स्पष्ट  

वर्धा : समाज बांधवांनो तुम्ही कुठल्याही संघटनेत राहा, कुठेही राजकारण करा पण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपले दैवत आहे हे विसरू नका, त्यांचा पूर्णाकृती पुतळा कुठल्याही परिस्थितीत उभा राहणारच, याकरीता आपण सर्वजण एकजुट होऊया, असे आवाहन बहुजन रयत परिषदेचे विदर्भ जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे यांनी केले.

वर्धा येथे नगरपरिषद सिव्हिल लाइन्स जवळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठीच्या प्रस्तावासंदर्भात वर्धा जिल्ह्याची रविवारी (ता. 22) वर्धा रेस्टॉउस येथे सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे होते. यावेळी ते बोलत होते. सभेला संबोधीत करताना डोंगरे म्हणाले की,  समाज बांधवांनो आपली एक पिढी या चळवळीत काम करतांना आपल्या मधून निघून गेली. स्वर्गीय मधुकरराव कांबळे, नागोरावजी मुंगले, सूर्यभानजी खांडेकर, मारोतरावजी तिळले (पेंटर), धनुजी वानखडे, मारोतरावजी बावनकर, बोदिले ताई , प्रधान गुरुजी, रामदासजी मुंगले यांनी स्वप्न पाहले होते की, अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नगरपरिषद सिव्हिल लाइन्स जवळ बसविण्यात यावा, त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरत आहे. हे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पहिजे, एकजुट राहिले पाहिजे, असेही जिल्हाध्यक्ष  डोंगरे यांनी सांगितले. 

या बैठकीला हिराताई खडसे, राजेश अय्युब, संजय तिळले (पेंन्टर), सुनिल पोटफोडे, चंद्रकांत तिळले, मंगेश पडघान, पुंडलीक काळे, सुधाकर डोंगरे, प्रशांत डोंगरे, कैलास मुंगले, विलास डोंगरे, किरण खडसे, उशाताई बावणे, जोसनाताई खडसे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. प्रशांत डोंगरे यांनी आभार मानले.