#

Advertisement

Friday, March 20, 2026, March 20, 2026 WIB
Last Updated 2026-03-20T14:32:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण...!

Advertisement

अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांची पोस्ट

मुंबई : भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून नाशिकच्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या असताना, आता या भोंदू बाबाचे नाव अजित पवार विमान अपघात प्रकरणाशीही जोडले जात आहे. अशोक खरातचे व्हिसीआरच्या मालकाबरोबरच हितसंबंध उघड झाल्याचे सांगून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी या भोंदू बाबाचे आणि आश्रमातील पुजाऱ्यांचे सीडीआर तपासण्याची मागणी केली आहे. आता याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आमदार अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते.
नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचे बेभरवशी राजकारण चांगले राहिलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.