Advertisement
संत गाडगे बाबा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांन खाऊ वाटप
मंगरुळ: बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशउपाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा वाढदिवस तुळजापुर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या वतीने सामाजिक उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात सोमवार ३० मार्चला साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम संत गाडगे आश्रम शाळेच्या विद्यार्थीनीच्या हस्ते केक कापून व जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, संत गाडगे बाबा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर क्षीरसागर, पत्रकार चांदसाहेब शेख, संभाजी खोपडे, बाबा बचाटे, सोशल वर्कर गणेश पवार यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना केक, जिलेबी, समोसा यासारख्या पदार्थांचा अल्पोहर देण्यात आला उपस्थित मान्यवरांनी अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या कार्यकर्तृत्वाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी संत गाडगे बाबा आश्रम शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमासाठी मंगरुळ येथील संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
