#

Advertisement

Wednesday, March 18, 2026, March 18, 2026 WIB
Last Updated 2026-03-18T12:23:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'अशोक खरात प्रकरणावर रुपाली चाकणकर राजीनामा देतील?'

Advertisement

उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल

मुंबई : सिन्नरमधील अशोक खरात प्रकरण गंभीर असल्याचा आरोप उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आरोपीच्या डोक्यावर छत्री धरत असतील तर ही बाब अधिक गंभीर असल्याचे म्हटले. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
सिन्नरचे अशोक खरात प्रकरण महाराष्ट्राचे एफस्टिन फाईल असल्याचा गंभीर आरोप उबाठा सेनेच्या नेत्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मात्र, रुपाली चाकणकर यांनी खरातवरील आरोपांबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगत आरोप फेटाळले असून, पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.