#

Advertisement

Friday, March 6, 2026, March 06, 2026 WIB
Last Updated 2026-03-06T11:37:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

चष्मा अन् दादा घालायचे तसंच जॅकेट...

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांना वाहिली अनोखी आदरांजली

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर महाराष्ट्राचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर मांडला. या अर्थसंकल्पावर अजित पवारांची छाप दिसून आली. डोळ्यावर चष्मा आणि तेच जॅकेट...हो, देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आले अन् अजित पवारांची आठवण झाली.
अजित पवार जसे गुलाबी जॅकेट घालायचे तसं जॅकेट घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादांना अनोखी आदरांजली वाहिली. अजित पवार हे कोणत्याही मोठ्या सरकारी कार्यक्रम असो किंवा इव्हेंट तेव्हा खास करुन गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करायचे. कालांतराने गुलाबी जॅकेट आणि अजित पवार असं समिकरण बनलं होतं. लाडकी बहीण योजना जाहीर करताना दादांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं. त्यानंतर महायुतीला घवघवीत यश मिळालं होतं. दादांचं अपूर्ण काम पूर्ण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी रंगाचे जॅकेट घातले.
अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच मुख्यमंत्री म्हणाले की, अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यानं आपण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहोत. यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्काराची घोषणा केली. तसंत राज्यात त्यांचे भव्य स्मारक देखील उभारण्यात येईल सर्वात मोठी घोषणा त्यांनी केली. तर फडणवीसांनी यंदाचा अर्थसंकल्प देखील दादांना समर्पित असल्याचं सांगितलं.