Advertisement
अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
मुंबई : भोंदूबाबा आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या संस्थेवरील सदस्यांचीही चौकशी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे, याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होणार आहे. कारण, त्या संस्थेवरील सदस्या आहेत.
अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार असून नाशिक पोलिसांकडून शिवनिका स्ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार आहे. या ट्र्स्टमध्ये रुपाली चाकणकर या देखील सदस्य असल्यामुळे आता त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून सभागृहात निवेदन देखील देण्यात आले. दरम्यान यावेळी बोलताना खरात याच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच, खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ईशान्येश्वर मंदिराच्या संपत्ती वाढ
भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याचे अनेक काळे कारनामे समोर आले. महिलांचे लैंगिक शोषण करत असतानाच मोठी माया देखील या भोंदूबाबाने जमवली आहे. 2009 मध्ये स्थापन केलेल्या शिवनिका संस्थानचा कारभार आता तपासण्यात येणार आहे. सुरुवातीच्या काळात अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या शिवनिका संस्थान 2025 पर्यंत कोट्यधीश झालेच कसे हा प्रश्न आता समोर येत आहे. या संस्थांनवर 2009 पासून असणाऱ्या विश्वस्त मंडळासह आजपर्यंतच्या सर्वच कार्यकारी मंडळाची चौकशी झाली तरच सगळे समोर येणार आहे.
