#

Advertisement

Friday, April 17, 2026, April 17, 2026 WIB
Last Updated 2026-04-17T17:07:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नागुपरातील शाळांना 17 एप्रिलला सुट्टी जाहीर!

Advertisement

नागपुर :  उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांना उद्या म्हणजेच शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. आदेशानुसार अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयं बंद राहणार आहेत. वाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पारा 43 च्या पार गेला आहे. पुढील काही दिवसात उष्णतेची तीव्रता अजून वाढणार असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यामुळे प्रशासन नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेत आहे. दुसरीकडे अकोल्यात शाळेच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी यासंदर्भात आदेश दिला आहे. त्यानुसार शाळा आता सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. नियमाचं पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. 

वर्ध्यात शाळा आणि अंगणवाडी यांना शासकीय सुट्टी जाहीर
वर्ध्यातही  16 एप्रिलला शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. वर्धा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने तब्बल 4 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला. उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे.