Advertisement
अमोल मिटकरींकडून नावं घेत गंभीर आरोप
सांगली : अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर ही मनाला चटका लावून गेलेली घटना कोणीही विसरलेलं नसलातनाच त्यांचे खंदे समर्थ आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा बारामती विमान दुर्घटनाप्रकरणी काही गंभीर आरोप केले आहेत. यावेळी थेट नावांचाच उल्लेख करत या विमान अपघातामागच्या मास्टरमाईंडलं नाव ज्यांनी जाहीर केलं.
सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अजितदादांच्या विमान अपघाताचा मास्टरमाइंड व्हीआरएस विमान कंपनी व त्याचा मालक व्ही के सिंग आणि डीजीसीएचे अधिकारी आहेत', असा थेट आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. या साऱ्यांवर सदोषम नुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आपण गप्प बसणार नाही, असं देखील आमदार मिटकरींनी स्पष्ट केलं.
जस्टिस फॉर दादा संवाद यात्रा
दरम्यान, अजित पवारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात जस्टिस फॉर दादा संवाद यात्रा काढण्यात येणार असल्याचंही अमोल मिटकरींनी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी, 14 मे रोजी या यात्रेला सुरुवात होणार असून प्रत्येक गावात जाऊन अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव देखील घेण्यात येणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं.
