#

Advertisement

Wednesday, April 8, 2026, April 08, 2026 WIB
Last Updated 2026-04-08T13:40:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पवारांची साथ सोडून 18 महिन्यात भाजपात

Advertisement

समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांची साथ सोडली 

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या बड्या नेत्याने पुन्हा स्वपक्षात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मात्र ज्या नेत्याने अवघ्या दीड वर्षांमध्ये शरद पवारांची साथ सोडून पुन्हा आपल्या पक्षाचा मार्ग स्वीकारला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा पूर्ण केल्यानंतर मागील बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पक्षप्रवेश पार पडला. नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडून येत पक्षाशी नाळ जोडलेलीच ठेवली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशनानंतर अधिकृत प्रवेशाबाबत प्राथमिक सहमती झाली होती.  हा प्रवेश सोहळा पार पडला. "माझ्या मूळ पक्षात परत येत असल्याचा मला अभिमान आणि समाधान आहे,” असे घाटगे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना घाटगे यांनी, देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे. पक्षाबाहेर असतानाही मी अनेकदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची पुन्हा संधी मिळत असल्याचा आनंद आहे अशी भावना व्यक्त केली. महापालिका निवडणुकांनंतर डिसेंबर महिन्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून, मी पुढील राजकीय भूमिका काय असणार आहे, हे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले उचलली आहेत,” असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.