#

Advertisement

Thursday, April 23, 2026, April 23, 2026 WIB
Last Updated 2026-04-23T17:51:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषदेसाठी 30 नावे

Advertisement

राष्ट्रवादीकडून लढलेल्या नेत्याचं नाव यादीत

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र भाजपकडून विधान परिषदेच्या जागांसाठी यादी दिल्लीच्या नेतृत्वाला पाठवण्यात आली आहे.  केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून ३० जणांची यादी पाठवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत. भाजपकडून 5 नावांसाठी 30 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाला सोपवण्यात आली आहे.

भाजपने पाठविलेली नावे :
माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी अशी नावं यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.