#

Advertisement

Friday, April 24, 2026, April 24, 2026 WIB
Last Updated 2026-04-24T12:11:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आम आदमी पक्ष फुटला

Advertisement

पक्षाचे दोन-तृतीयांश खासदारा भाजपमध्ये विलीन होणार 

दिल्ली : महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबत घडलं आता तसंच अरविंद केजरीवाल यांच्यासह घडताना दिसत आहे. भारतात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आम आदमी पक्षाचे दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये विलीन होणार आहेत. 'आप'चे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या  अनेक खासदार आप पक्ष सोडमार आहेत. हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  

राजीनामा देताना 'आप'चे दोन-तृतीयांशपेक्षा जास्त राज्यसभा खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा राघव चड्ढा यांनी केला. . हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी आणि अशोक मित्तल यांच्यासह अनेक नेते राघव चड्ढा यांच्यासोबत पक्ष सोडणार आहे. राज्यसभेत 'आप'चे 10 खासदार आहेत, त्यापैकी सात पंजाबचे आणि तीन दिल्लीचे आहेत. राघव चड्ढा, संदीप सिंग आणि अशोक मित्तल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्रात झाला होता मोठा राजकीय भूकंप
महाराष्ट्रातही असाच मोठा राजकीय भूकंप झाला होता.  एकनाथ शिंदे  40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. यामुळे शिवसेना पक्ष फुटला. 40 आमदारांचा गट घेऊन एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत सामील झाले. तर, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांनी देखील आपला वेगळ गट स्थापन केला आणि या गटाला घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. आता, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात देखील उभी फूट पडली आहे. राघव चड्ढा यांच्यासह  आपचे दोन-तृतीयांश खासदार भाजपमध्ये विलीन होणार आहेत.