#

Advertisement

Tuesday, April 28, 2026, April 28, 2026 WIB
Last Updated 2026-04-28T17:49:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप कार्यकर्त्यावर एकापाठोपाठ 9 गोळ्या झाडल्या

Advertisement

मावळ : देहुरोडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. भाजप कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  देहूरोडमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. रमेश रेड्डी असं गोळीबार मृत व्यक्तीचं नाव आहे.   भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात नऊ राऊंड फायर केले. यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने ते जागेवर कोसळले.  जखमी अवस्थेत त्यांना  देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबाराची बातमी समजताच परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.