Advertisement
32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ITAT मध्ये दिलासा मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्या विरोधातील आयकर कायद्याच्या कलम 153C अंतर्गत सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यात आली आहे. अघोषित उत्पन्न म्हणून जोडलेली 32.14 कोटी रुपयांची रक्कमही रद्द केली आहे. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले, त्यानंतर सुनेत्रा पवार यांची भूमिका केवळ प्रक्रियेसाठी रेकॉर्डवर घेण्यात आले होते. अजित पवार आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये काही कथित व्यवहारांचे प्राप्तकर्ते होते, आयटीएटी खंडपीठाला पुरावा अपुरा आढळला आहे.
IT ने टाकलेल्या छाप्यात जितेन पुजारी यांच्याकडून ट्रायटन ग्रुपच्या डायऱ्या आणि वह्या जप्त करण्यात आल्या होत्या. ज्यात DD नावाच्या व्यक्तीच्या नावे 32 कोटींचे व्यवहार आयकर विभागाला आढळले, आणि त्या आधारे हे 'DD' हे अजित पवार असावेत ह्या तर्काच्या आधारे अजित पवार यांच्या उप्पन्नाचे मुल्यांकन करण्याची कारवाई IT विभागाने केली. मात्र सुनावणी दरम्यान ITAT समोर 'DD' म्हणजे अजित पवार हे सिध्द करण्यास इनकम टॅक्स विभाग अपयशी ठरल्याचे सुनावणी दरम्यान दिसून आले आणि ITAT ने अजित पवार यांना क्लिनचीट दिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कायदेशीर वारसदार म्हणून सुनेत्रा पवार यांना 'आयकर अपील न्यायाधिकरणा'कडून (ITAT) मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्या नावावर जोडलेले ३२.१४ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न आणि त्यावरील कायदेशीर कारवाई न्यायाधिकरणाने रद्द ठरवली आहे.
