#

Advertisement

Wednesday, April 1, 2026, April 01, 2026 WIB
Last Updated 2026-04-01T12:00:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तीन अर्ज दाखल

Advertisement

बारामती  विधानसभा  पोटनिवणूक 

पुणे : बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार तसेच राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपाने बारामतीमधून उमेदवार न देण्याचे आवाहन केले असून सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून आणण्याची भूमिका घेतली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. त्या आज अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध तिघांनी अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवारांविरोधातील एक जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी केला आहे. कृष्णा कदम हे 'हिंदुस्तान जनता पार्टी'कडून निवडणूक लढवत आहेत. तर सातारा येथील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे यांनी 'न्यू राष्ट्रीय समाज पार्टी'च्या वतीने बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवारांरोधात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कोणा-कोणाचा अर्ज कायम राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
दरम्यान, बारातमीमधील बिनविरोध भूमिकेवरुन भाजपावर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी निशाणा साधला आहे. भाजपला एवढीच काळजी असेल तर त्यांनी सुनेत्रा पवार यांना खुशाल विधान परिषदेवर पाठवावे, पण बारामतीची पोटनिवडणूक होऊ द्यावी, तिथं प्रत्येक वेळी पवार कुटुंबातला उमेदवार कशासाठी हवाय? असा सवाल हाके यांनी केला आहे. "काहीही झालं तरी बारामतीची पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही," असं हाकेंनी म्हटलं आहे.