#

Advertisement

Wednesday, April 1, 2026, April 01, 2026 WIB
Last Updated 2026-04-01T12:29:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माझी काही चूक नाही...

Advertisement


मंत्री नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया 

मुंबई : मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझी यात काही चूक नाही असं म्हणत नरहरी झिरवाळ यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे यासाठी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्र दिलं असल्याची माहिती देखील समोर आली आहे.  मंत्री नरहरी झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.  झिरवळ यांनी स्वतःची बाजू पक्षाच्या अध्यक्षांकडे मांडली.  माझी यात काही चूक नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे मत झिरवळ यांनी मांडल्याचे माहिती समोर आली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीला झिरवळ यांनी दांडी मारली. मात्र, पक्षाच्या पुढील आठवड्यातील बैठकीत उपस्थित राहून देखील बाजू मांडणार आहेत.
मंत्री नरहरी झिरवाळांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत मंत्री नरहरी झिरवाळ आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे खरात प्रकरणात चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता झिरवाळ सुद्धा अडचणीत आले आहेत. या व्हीडिओवरुन थेट त्यांच्याराजीनाम्याचीच मागणी केली जात आहे.