#

Advertisement

Wednesday, April 15, 2026, April 15, 2026 WIB
Last Updated 2026-04-15T12:31:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'कैसा हराया...' सहर शेखचं नगसेवकपद जाणार?

Advertisement


वडिलांनी कागदपत्रात केलेली फसवणूक उघड 

मुंबई : कैसा हराया? म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचणाऱ्या मुंब्र्यातील एमआयएमच्या ठाणे महानगरपालिकेतील नगरसेविका सहर शेख हिचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. सहर शेख यांच्याकडील जातीचा दाखला चुकीचा असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भातील तपास केला जाणार असून खरोखरच सहर शेख हिचे जात प्रमाणपत्र खोटं ठरले तर सहर शेख हिचे नगरसेवक पद जाऊ शकते.
याबाबतचे प्रकरण असे आहे की, उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी असलेले सहर शेख यांचे वडील युनूस इकबाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. त्यांनी इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना-8 वापरून व अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविला. तर सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षातून मुंब्यातील प्रभाग 30 मधून निवडणूक जिंकल्या. त्यांच्या विजयी रॅलीमधील भाषण चांगलेचं गाजले आणि त्या भारतभर चर्चेत आल्या. मात्र, आता सहर शेखने निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचं सांगितलं जात आहे. खरोखरच हे दावे सिद्ध झाले तर सहर शेखचं नगरसेवकपद जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या इतर मागास प्रवर्गाचा प्राप्त दाखल्याची चौकशी व्हावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. तसेच सहर शेख यांचे वडील युसूफ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य ठरणार असल्याचं शिफारशीमध्ये म्हटले आहे. शेख व मुलगी सहर यांचे जातीचे दाखले रद्द होणे आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आली असून पुढील कारवाई काय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.