Advertisement
दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) चा 10 वीचा 2026 चा निकाल जाहीर झाला आहे. CBSE चा रिझल्ट अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in वर पाहू शकता. विद्यार्थी या संकेतस्थळावर आपल्या रोल नंबरच्या मदतीने ऑनलाइन मार्कशीट पाहू शकतात आणि डाऊनलोड देखील करु शकता.
विद्यार्थी त्यांचे गुणपत्रक विविध अधिकृत माध्यमांवरून तपासू शकतील: cbseresults.nic.in, cbse.gov.in, DigiLocker आणि UMANG ॲप. आपला निकाल ऑनलाइन तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर, स्कूल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. लॉग इन केल्यानंतर लगेचच डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. CBSE इयत्ता 10वी निकाल 2026 साठीची थेट लिंक अधिकृत वेबसाइट www.cbse.gov.in वर सक्रिय करण्यात आली आहे. डिजीलॉकरने विद्यार्थ्यांना विनाविलंब आपली खाती तयार करण्याचे आवाहन केले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांकडे APAAR आयडी नाही, त्यांना तो आधी तयार करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांचा APAAR आयडी CBSE शी जोडलेला आहे, त्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर डिजीलॉकरच्या 'इश्यूड डॉक्युमेंट्स' विभागात त्यांच्या गुणपत्रिका मिळतील. उमंग ॲपने देखील ट्विट केले आहे की, CBSE इयत्ता 10वीचा निकाल 2026 ॲपवर जाहीर केला जाईल. विद्यार्थी आपला रोल नंबर टाकून ऑनलाइन निकाल तपासू शकतील. निकाल तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
सीबीएसई 10वी निकाल 2026 कसा तपासावा
स्टेप 1 - विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
स्टेप 2 - विंडो उघडल्यावर, 'माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता 10वी) निकाल 2026' या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 - तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र आयडी प्रविष्ट करा.
स्टेप 4 - माहिती सादर केल्यावर, निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5 - विद्यार्थ्यांनी भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड किंवा प्रिंट करावा
