#

Advertisement

Saturday, April 25, 2026, April 25, 2026 WIB
Last Updated 2026-04-25T12:02:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधान परिषदेसाठी करोडो रुपये मोजण्याची तयारी

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षनिधी देणाऱ्यांची संख्या अधिक  

बारामती : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेतील दहा जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेला येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या या एका जागेवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पक्षाकडे जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती आहे. ही जागा आपल्या पदरात कशी पडेल, यासाठी इच्छुकांकडून सध्या वेगवेगळ्या क्लुपत्या लढवल्या जात आहे. काही जणांनी तर थेट पक्षातील वरिष्ठांकडे पक्षनिधी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षनिधीच्या नावाखाली पक्षातील एक माजी आमदार आणि पुण्यातील उदयोपती आणि माजी खासदार यांच्या चिरंजीवाने करोडो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकानी आपण स्वत खासदार पार्थ पवार आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना न भेटता शिष्टमंडळाच्या माध्यमातून गळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही जणांकडून अजित पवारांनी जाहीर सभेच्या माध्यमातून दिलेल्या आश्वासनांचा व्हिडीओ समोर आणला जात आहे. तर काहींनी तर थेट सोशल मीडियात पत्र लिहून उमेदवारीची मागणी केली आहे. काही जणाकडून जातीचा दाखला देत आत्तापर्यंत मराठा मुस्लिम समाजाला विधान परिषदेवर नेतृत्व देण्यात आलं. मग दलित समुदायाला का नाही? असा सवाल उपस्थित करताना एमएमडी फॅक्टर राबवण्याची मागणी केली आहे.