#

Advertisement

Saturday, April 25, 2026, April 25, 2026 WIB
Last Updated 2026-04-25T12:17:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी

Advertisement

खासदार पार्थ पवार यांची मध्यस्थी 

बारामती : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खासदार पार्थ पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचे समोर आले आहे. यात पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याची माहिती मिळत आहे. शहर पदाधिकारी यांची आज खासदार पार्थ पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान आजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांचा वाद झाला. सहयोग या निवासस्थानी हि बैठक बोलावली होती. यावेळी हा वाद झाल्याचे समजते आहे. मात्र हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र पार्थ पवारांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला असल्याची सूत्रांची माहिती आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. पिंपरी - चिंचवड मधील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी शहरात हे फ्लेक्स लावले आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित मानला जात असून त्यांच्या समर्थकांकडून आधीच शुभेच्छाचे बॅनर लावायला सुरुवात केली आहे.