#

Advertisement

Tuesday, April 28, 2026, April 28, 2026 WIB
Last Updated 2026-04-28T18:10:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार : मुख्यमंत्री फडणवीस

Advertisement

बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनाच्या निमित्ताने महापूजा

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून बार्शी येथील श्री भगवंत प्रकट दिनाच्या निमित्ताने त्यांनी महापूजा केली. त्यानंतर, सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी सोलापूर जिल्ह्याचं अध्यात्मिक महत्त्व आणि विकासासंदर्भाने भाषण केलं. सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार बंदराशी जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत, असे म्हणत लवकरच येथे आयटी पार्कही सुरू होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन थांबवण्यासाठी देखील आपण काम करतोय, अशी माहितीही त्यांनी दिली. तर, पंढरपूर कॉरिडोअरसंदर्भात व्यापाऱ्यांना विश्वास देत, तुमचा धंदा 10 पट वाढेल असेही त्यांनी म्हटलं. 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे शिल्पकार येथील जनता आहे, त्यांनतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यानंतर आमदारांची फौज आहे. या सगळ्यांनी मिळून हा विजय खेचून आणलाय, हा विजय विकासाचा विजय, विकासाच्या मुद्यावर ज्यांचा विश्वास त्यांचा विजय आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीना सांगतो की, अनेकांना वाटतं माझ्यामुळेच मी निवडून आलो, त्यामुळे त्यांचा व्यवहार बदलत जातो. लोकं जसा तुमचा विकास पाहतात तसा तुमचा व्यवहारही पाहतात. एकवेळ विकास कमी चालेलं पण व्यवहार लोकं जास्त लक्षात ठेवतात, एखादं काम होणार नसेल तरी लोकं म्हणतात आमच्याशी कसा वागतो, असे म्हणत काही लोकप्रतिनिधींना चिमटेही काढले.

लवकरच आयटी पार्क सुरू करू - फडणवीस
सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, पण आमचा प्रयत्न आहे याचं वर्षात ते महाविद्यालय सुरु व्हावं. आयटी पार्क घोषणा करून थांबलो नाही. फेब्रुवारीमध्ये आम्ही त्यासाठी जमीन देखील दिली. आता, लवकरच हे आयटी पार्क सुरु करून शिकलेल्या लोकांना इथंच कामं द्यायचा प्रयत्न आहे, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.