Advertisement
दौंड तालुक्यातील नांदुर ग्रामपंचायत सरपंच पोट-निवडणूक
पुणे : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मोठा झटका बसला, त्याना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण ताजे असतानाच आता त्यांचे सख्खे भाऊ संतोष बोराटे यांना ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भावाच हा पराभव चाकणकर यांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. राजकीय दृष्ट्या भविष्यात अडचणी वाढण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.
दौंड तालुक्यातील नांदुर ग्रामपंचायतीची सरपंच पोट-निवडणूक झाली. या निवडणुकीत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बबन बोराटे हे निवडणूक रिंगणात होते. ते कुल गटाकडून मैदानात होता. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्या दृष्टीने त्यांनी प्रचार ही केला होता. आमदार राहुल कुल यांची ताकद आणि बहीण रुपाली चाकणकर यांचा पाठिंबा बोराटे यांच्यासाठी जमेची बाजू होती. पण, त्यांचा अंदाज चुकला. संतोष बबन बोराटे यांना मोठ्या फरकाने पराभव सहन करावा लागला. त्यांचा विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल 304 मतांनी पराभव केला आहे.
थोरात गटाने विशाल थोरात यांच्यावर ग्रामस्थांनी विश्वास दाखवला आहे. स्थानिक समीकरणे आणि धनगर समाजाच्या पाठिंब्यावर विशाल थोरात यांनी विजय मिळवत ग्रामपंचायतीवर पुन्हा थोरात गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले. हा बोराटे यांचा पराभव नसून कुल यांना ही दणका आहे. पण सर्वात मोठा फटका हा रुपाली चाकणकर यांना समजला जात आहे.
