#

Advertisement

Monday, May 4, 2026, May 04, 2026 WIB
Last Updated 2026-05-04T12:39:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक !

Advertisement

बारामतीतील पोटनिवडणुकीत २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजयी 

बारामती : दादांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, मन खरं तर खूप भरून येत आहे. पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकासकामावरचं प्रतिक म्हणून आज त्यांना भावांजली वाहिलेली आहे असं मी म्हणेन, बारामतीकरांनी दिलेलं मतदान हे दादांवरील विश्वास त्यांनी आजवर केलेली कामे, सेवा आणि जनतेवरचं प्रेम हे जनतेने त्यांच्या मतातून मला दिलं असं मी मानते आहे, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी भावुक होत मतदारांचे आभार मानले. 
बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात असलेल्या २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना ४८३७ इतकी मते मिळाली. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे, विक्रमी मतांनी सुनेत्रा पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध  करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घ्यावे लागले. या निकालाची औपचारिकता बाकी होती. कार्यकर्ते, पार्थ पवार आणि जय पवारांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवारांना विक्रमी मते मिळाली आहेत. या विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहेत.

बारामती पोट निवडणुकीतील सर्व मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे, असं सांगितलं जात आहेत.