Advertisement
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मुंबई : महाराष्ट्रात इतका मोठा नेत्याचा अपघात होतो आणि त्याची साधी चौकशी होत नाही अशा खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस गप्प का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गुन्हा दाखल करा ही दुसऱ्या बाजूला महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे गटाला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चपराक होती. कर्नाटक सरकारमध्ये जो गुन्हा दाखल करुन ट्रान्सफर झाला आहे, त्यावर कारवाई चौकशी होत नाही. अपघात की घातपात...घातपातातच्या अनुषंगाने उपस्थित झालेले मुद्दे याचा पाठपुरावा करत राहू.
महाराष्ट्रात इतक्या मोठा नेत्याचा अपघात होतो आणि त्याची साधी चौकशी होत नाही. देवेंद्र फडणवीस आम्ही जमिनीतून खोदून काढू, आकाशातून आणू, शोध लावल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणत आहेत. तुम्ही या प्रकरणी मागील अडीच महिन्यांपासून गप्प आहात. त्याचं कारण सांगायला तयार नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण अशा स्वरुपात वागत आहेत. ब्लॅकबॉक्स सापडला नाही, अपघात कसा झाला अशा तर्कशुद्ध प्रश्नांचा पाठपुरावा ते करत नाहीत. पहिल्या अहवालात झाडाला विमान अडकलं आणि पडलं असं सांगितलं आहे. झाड नसताना झाड दाखवणं अशा चुका आणि संदर्भ असताना फडणवीस काही बोलत नाहीत. अजित पवारांचा पक्ष मुकाट्याने सोबत राहतो. ही वस्तुस्थती वाईट आणि अशोभनीय आहे.
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासंदर्भात चर्चा सुरु होती त्यावेळी आमच्या उमेदवाराने पक्षाची भूमिका मांडली होती. बिनविरोध होण्यासाठी इतका जोर लावण्यापेक्षा गुन्हा दाखल करुन द्या. गुन्हा दाखल केला तर उमेदवारी मागे घेतो असं सांगितले. गावाच्या कट्ट्यावर आणि स्थानिक पातळीच्या तालमीत दंड ठोठावताना आमच्या उमेदवाराने केलेले हे विधान होतं. ते तंतोतंत खरे आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
