#

Advertisement

Friday, April 24, 2026, April 24, 2026 WIB
Last Updated 2026-04-24T12:49:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय !

Advertisement

जय पवार आणि पार्थ यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी 

पुणे : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. तसंच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड करत सर्व हक्क त्यांच्याकडे सोपवण्यात आले. सुनेत्रा पवार राज्यात आल्याने रिक्त झालेल्या खासदारकपदी पार्थ पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचाही शपथविधी पार पडला. दरम्यान आता पवार कुटुंबात जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
मुंबई, पुण्यासह दिल्लीची जबाबदारी पार्थ पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे तर जय पवारांकडे बारामती, बीडसह ग्रामीण भागाची जबाबदारी दिल्याची माहिती आहे. पक्षातील संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अंतिम निर्णय मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून ही जबाबदारी दिली असल्याची माहिती आहे.
दरम्यान जय पवार यांनी 2029 मध्ये बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. "मी मीडिया समोर येऊन सारखं बोलत नाही. लोकांची मागणी आहे की 2029 मध्ये बारामतीचा उमेदवार मी व्हावं. माझी अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं. मी निवडणूक लढवावावी ही लोकांची इच्छा आहे," असं जय पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर संवाद साधताना म्हटलं आहे.