#

Advertisement

Wednesday, May 20, 2026, May 20, 2026 WIB
Last Updated 2026-05-20T15:03:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम

Advertisement

अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह अन्य जागांवर होणार लढत

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांची निवडणूक १८ जून रोजी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल तर महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी बराच संघर्ष करावा लागणार असल्याचं चित्र संख्याबळावरून दिसत आहे. या निवडणुकीसाठीचे मतदार हे महापालिकांचे सर्व नगरसेवक, नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक, जिल्हा परिषदांचे सदस्य, सर्व स्वीकृत सदस्य, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य असतात.

यापैकी १६ जागांसाठीची निवडणूक तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नागपुरमध्ये भाजपचे मेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला होता. बावनकुळे यांच्या या जागेचा कार्यकाळ १ जानेवारी २०२८ पर्यंत आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या जागेवर निवडणून येणाऱ्या आमदाराला दीड वर्षासाठीच आमदारकी मिळणार आहे. अन्य १६ जणांना ६ वर्षाचा कार्यकाळ मिळेल. 

१) पुणे २) अहिल्यानगर ३) ठाणे ४) जळगाव ५) सांगली-सातारा ६) नांदेड ७) यवतमाळ ८) सोलापूर ९) भंडारा-गोंदिया १०) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ११) नाशिक १२) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली १३) अमरावती १४) धाराशिव-लातूर-बीड १५) परभणी-हिंगोली १६) छत्रपती संभाजीनगर - जालना १७) नागपूर (पोटनिवडणूक) या ठिकाणी निवडणूक होत आहे. 

...........................

सोलापूर 

...................................

प्रशांत परिचारक (भाजप)

अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)

ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)

जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)

सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)

नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)

यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)

...........................

पुणे 

...........................

अनिल भोसले (राष्ट्रवादी)

भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)

 अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)

...........................

इतर 

...........................

धाराशिव : सुरेश धस (भाजप) ,  परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना) 

छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना), चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)


  • अधिसूचना जारी : २५ मे

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख : १ जून

  • अर्जाची छाननी : २ जून

  • अर्ज माघारीची शेवटची तारीख : ४ जून

  • मतदान : १८ जून - स. ८ ते दु. ४.

  • मतमोजणी : २२ जून