#

Advertisement

Monday, May 25, 2026, May 25, 2026 WIB
Last Updated 2026-05-25T13:19:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण?

Advertisement

युगेंद्र पवारांनी सांगितली कार्यकर्त्यांची इच्छा

पुणे : विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये 17 पैकी केवळ 1 जागा मिळणार असल्याचे दिसून येते. एकीकडे विधानपरिषद निवडणूक रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे पुन्हा एकदा 2029 मध्ये बारामतीतून विधानसभा कोण लढवणार याची चर्चाही होत आहे. यापूर्वी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगत बारामती विधानसभा मतदारसंघातून 2029 ची निवडणूक लढवण्यावर भाष्य केलं होतं. आता, युगेंद्र पवार यांनीही 2029 च्या निवडणुकीसंदर्भाने मोठं वक्तव्य केलं आहे. 
बारामती संवाद बैठकीबद्दल युगेंद्र पवार यांनी माहिती दिली. शरद पवारांनी वाय.बी.सेंटरला एक मीटिंग बोलवली होती, त्याठिकाणी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला होते. लवकरात लवकर तुम्ही पक्षाच्या सर्व नियुक्त्या करा, अशा सूचना आम्ला तिथे देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही आमचं काम सुरू केल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. तसेच, 2029 मध्ये बारामती विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. पवार विरुद्ध पवारच लढाई होईल याची काय खात्री आहे? उद्या काहीही होऊ शकते, असे म्हणत युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सगळेच जण संभ्रमात होते, पण विलीनीकरण आता होणार नाही. आपली भूमिका आपण क्लियर केली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील क्लियर केलं आहे, आता विलीनीकरण होणार नाही. त्यांचा निरोप, संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी मी बोललो. आता, विलीनीकरण होणारच नाही, असेही युगेंद्र यांनी स्पष्ट केले.