#

Advertisement

Friday, May 15, 2026, May 15, 2026 WIB
Last Updated 2026-05-15T16:40:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पाकिस्तानमध्ये पेट्रोल 457.86, डिझेल 520.42 प्रति लिटर

Advertisement

नेपाळ, श्रीलंकेत इंधन दरांनी मोडले सर्व रेकॉर्ड

दिल्ली : भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमुळे मागील काही दिवसांपासून नागरिक संतप्त आहेत, पण, शेजारील देशांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती या आता गगनाला भिडल्या आहेत आणि त्या देशामधील लोकांना त्यांचा मोठा फटका बसत आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा फटका बसल्यामुळे फारच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 3 महिन्यांमध्ये पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठ्याने वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यात पेट्रोल 64% आणि डिझेल 61% वाढ झाली आहे. पाकिस्तानमधील पेट्रोलचे दर हे 457.86 वर पोहोचले आहेत, तर डिझेलचे दर हे 520.42 पाकिस्तानी प्रति लिटरवर पोहोचले आहेत. हे भारताच्या चलनानुसार सांगायचे झाले तर पेट्रोल 157.34 रुपये आणि डिझेल 178.45 प्रति लिटर महागले आहे.

पाकिस्तानमध्ये आता इंधन आणि वीज वाचवण्यासाठी 4 दिवस काम करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारने देखील शाळा बंद केल्या आहेत. पाकिस्तानमध्येच नाही तर नेपाळमध्ये देखील इंधन महागले आहे आणि आता नेपाळ हा आता दक्षिण आशियामध्ये सर्वात महाग पेट्रोल विकणारा देश ठरला आहे. कारण नेपाळ हा पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे, त्यामुळे 2026 मध्ये मागील काही महिन्यात त्यांनी 4 वेळा इंधनामध्ये दरवाढ करण्यात आली आहे. नेपाळच्या पेट्रोल वाढीच्या किंमतींवर नजर टाकली तर जानेवारीमध्ये 137 नेपाळी रुपये पेट्रोल होते ते आता 219 नेपाळी रुपयांपर्यत पोहोचले आहे. भारतीय रुपयांमध्ये ही 123.58 रुपये इतकी आहे.

श्रीलंकामध्ये आशियातील सर्वात मोठी इंधन वाढ झाली आहे, ऑटो डिझेलचे दर हे आता 26.1% वाढले आहेत म्हणजेच 382 रुपयांवर पोहोचले आहेत. तर पेट्रोलच्या दराबद्दल सांगायचे झाले तर 398 श्रीलंकाई रुपये म्हणजेच भारतीय चलनानुसार १०८.५५ रुपये प्रकि लिटर झाले आहे. त्याचबरोबर महागाई टोकाला पोहोचल्यामुळे गरजेपेक्षा जास्त इंधन बंद करण्यात आले आहे. बांग्लादेशच्या दरांबद्दल सांगायचे झाले तर बांग्लादेशमधील सरकारला सबसिडीचा भार न झेलता आल्यामुळे मागील महिन्यात 10 ते 16 टक्के वाढ करण्यात आली आहे. सध्या तरी भारतामध्ये इंधनाच्या दरांमध्ये परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणामध्ये आहे. 15 मे 2026 पर्यत पेट्रोल हा 3.15 रुपयांनी वाढला आहे आणि डिझेल हा 3.11 रुपयांनी वाढ झाली आहे.