#

Advertisement

Monday, May 4, 2026, May 04, 2026 WIB
Last Updated 2026-05-04T12:54:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मतांमध्ये अभिजीत बिचकुलेंनी करुणा मुंडेंना मागे टाकले

Advertisement

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ५ नंबरवर 

बारामती : बारामतीची पोटनिवडणूक अनेकांनी बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले, मात्र 23 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केल्यामुळे येथे निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्षांनी येथे उमेदवार दिला नसला तरी, स्थानिकांसह बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा-मुंडे यांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, येथील निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा भरगोस मतांनी, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल, असा विश्वास राष्ट्रवादीसह महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, सुनेत्रा पवार यांनी रेकॉर्डब्रेक मत घेत विजय मिळवला.
बारामतीच्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर कोणता उमेदवार ठरला याची देखील उत्सुकता सर्वांना होती, येथील निवडणुकीत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे आर.वाय. घुटुकडे हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले, घुटुकडे यांना केवळ 932 इतकी मतं मिळाली आहेत. यासह, येथील मतदारसंघात अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा यांच्या मतांचीही उत्सुकता होती.
अभिजीत बिचुकले यांना बारामती विधानसभा निवडणुकीत अवघे 332 मतं मिळाली असून ते 5 व्या क्रमांकावर राहिले आहेत. तर, करुणा शर्मा यांना 300 मतं पडली असून त्या सहाव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांपेक्षा नोटाने अधिक मतं घेतली आहेत. नोटाला बारामती मतदारसंघात 729 मतं पडली आहेत. तर, अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोटे हे 40 मतांसह सर्वात कमी मत घेणारे उमेदवार ठरले आहेत.