Advertisement
16 मेपासून नियमित रेल्वे धावणार
सोलापूर : पंढरपूर-तिरुपती ही साप्ताहिक रेल्वे आता 16 मेपासून नियमितपणे सुरू होत आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे रेल्वेमार्गाने थेट जोडली गेली आहेत. 17437 आणि 17438 या क्रमांकाच्या ट्रेन असणार आहेत.
ही रेल्वे प्रवासादरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. महाराष्ट्रातील मोडलिंब, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर या स्थानकांवर थांबेल. कर्नाटक/तेलंगणातील बीदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, काचीगुडा, शादनगर, महबूबनगर येथे थांबेल. तर आंध्र प्रदेशातील वानपर्थी रोड, गदवाल, कर्नूल सिटी, धोन, गुटी, ताडपत्री, येरगुंटला, कडाप्पा, राजमपेटा आणि रेनिगुंटा येथे थांबेल. आतापर्यंत पंढरपूरहून तिरुपतीला जाण्यासाठी भाविकांना खासगी ट्रॅव्हल्स किंवा सोलापूरला जाऊन रेल्वे पकडावी लागत होती. आता थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग
- तिरुपती-पंढरपूर साप्ताहिक गाडी दर शनिवारी तिरुपती येथून दुपारी 4 वाजता सुटेल.दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री 7 वाजता ही गाडी पंढरपूरला पोहोचेल.
- पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक गाडी दर रविवारी पंढरपूर येथून रात्री 8 वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री 11.30 वाजता तिरुपतीला पोहोचेल.
