Advertisement
रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर यांची भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी रुपाली चाकणकरांची तब्बल 6 तास चौकशी केली. या चौकशीत रुपाली चाकणकर काय काय म्हणाल्या याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितले.
एसआयटी चौकशीत रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते. झे आणि अशोक खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केला नाही. खरात याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असा दावाही रुपाली चाकणकरांनी केला.
चौकशीत मी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिली आहेत. मला विश्वास वाटतो नक्कीच त्यांचं उत्तराने समाधान झालं असेल. पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय प्रश्न विचारले हे अहवालातून तुम्हाला कळेल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. पोलिसांना जे आवश्यक होतं त्यात मी सर्व सहकार्य केले. तपासात सविस्तर मी तपास यंत्रणासोबत बोलले. समर्पक उत्तर दिली आहे. चौकशी संदर्भात सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईल, असं रुपाली चाकणकरांनी सांगितले.
