Advertisement
पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी परदेशी दौरा केला रद्द
पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी मुख्यमंत्र्यानंतर आता पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे आजचं कामकाम सायकलवर करत आहेत. पण केवळ एक दिवस सायकल प्रवास करुन भागणार नाही, त्यामुळं आठवड्यातून एक दिवस सायकलवरून कामकाज करण्याचा निर्धार केला आहे. मी पदावर आहेत तोपर्यंत याचं अनुकरण करेल, असे महापौर म्हटले आहेत. सोबतच स्मार्ट सिटी अंतर्गत शेअरिंग सायकलची बारगळेलेली योजना नव्याने सुरु करणार असल्याचे आणि प्रत्येक रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक थेट बैलगाडीने पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल झाले. आजच्या सर्व साधारण सभेला हजेरी लावताना पंतप्रधानांच्या आवाहनाला त्यांनी असा प्रतिसाद दिला. मात्र, महायुतीतील भाजप पालिकेत उधळपट्टी करुन पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासत आहेत, अशी, टीका या नगरसेवकांनी केली.
दरम्यान, महापौर रवी लांडगे यांनी परदेश दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साथ देत, देशहितासाठी हा अभ्यास दौरा रद्द करत असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. सोबत, आठवड्यातून एक दिवस सायकल वर प्रवास करणार, पालिका अधिकाऱ्यांना प्रति महिना पन्नास हजार रुपयांचा इंधन भत्ता देण्याचा प्रस्ताव फेटाळणार आणि नव्याने खरेदी केली जाणारी वाहने इलेक्ट्रिक खरेदी करणार असल्याचे लांडगे यांनी स्पष्ट केले.
