#

Advertisement

Wednesday, May 27, 2026, May 27, 2026 WIB
Last Updated 2026-05-27T11:43:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कर्नाटकमध्ये असणार चार उपमुख्यमंत्री

Advertisement

डी.के.शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री : लिंगायत, दलित, OBC आमदारांना संधी 

कर्नाटक : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सत्तानाट्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या सगळ्यात आणखी एक नवा ‘फॉर्म्युला’ समोर आला असून राज्यात तब्बल 4 उपमुख्यमंत्री नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दलित, ओबीसी, लिंगायत आणि अल्पसंख्याक समाजातून प्रत्येकी एका नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. दलित गटातूनजी.परमेश्वरा आणि प्रियांक खर्गे यांची नावं चर्चेत आहेत. ओबीसी गटातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांचं नाव पुढे आलं आहे. लिंगायत समाजातून M. B. पाटील आणि ईश्वर खांद्रे यांना संधी मिळू शकते. तर अल्पसंख्याक गटातून के.जे. जॉर्ज, यू.टी. खादर आणि जमीर अहमद खान यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
सूत्रांच्या दाव्यानुसार, राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचा सल्ला दिला असून डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे. बदल्यात सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका आणि त्यांचे पुत्र यतींद्र यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे .याशिवाय, औपचारिक घोषणेपूर्वी सिद्धरामय्या हे मंत्र्यांसोबत आणि आमदारांसोबत डिनर बैठक घेऊ शकतात. काँग्रेसचे वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या उपस्थितीत याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.