#

Advertisement

Wednesday, May 27, 2026, May 27, 2026 WIB
Last Updated 2026-05-27T12:20:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना !

Advertisement

अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली भावना 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या विभाजनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चां सातत्याने होत आहेत. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री पदासाठी पक्षाची धुरा सुनेत्रा पवार या सांभाळत आहेत, या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर त्याचे स्वागतच केले जाईल, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तसेच, आम्ही आजही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांशी बांधील आहोत आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादी कांग्रेस एकत्र येण्याच्या विषयावर पडदा पडला असला तरी अनेकांनी मात्र तीच भवना आहे, यामुद्यावर  अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे लक्षवेधी बरोबर बोलत होत्या. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे राज्याच्या राजकारणातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध काळात मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत ग्रामीण भागातील प्रश्नांवर प्रभावी काम केले आहे. लक्ष्मण ढोबळे हे शरद पवार यांचे दीर्घकाळ निकटवर्तीय सहकारी राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांनी पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे ढोबळे कुटुंबाची भूमिका सध्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, राज्यातील पुरोगामी विचारांची ताकद एकत्र येणे ही काळाची गरज आहे. विचारधारा आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र यावे. सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मोठे निर्णय झाले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक कार्यकर्त्यांमध्येही दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र यावेत, अशी भावना व्यक्त होत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. विशेषत: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा राजकारणाच्या दृष्टीने नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी यांनी घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरणारी आहे.