#

Advertisement

Wednesday, May 27, 2026, May 27, 2026 WIB
Last Updated 2026-05-27T12:21:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणताही वाद नाही

Advertisement

आमदार संजय बनसोडे यांनी केले स्पष्ट 

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक (26 मे) पार पडली आहे. बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त करत, पक्षातील कुणीही आमच्या बाजूनं उभं राहत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसंच टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं, यावर वरिष्ठ नेतृत्व भूमिका घेणार का? असा सवालही सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी बैठकीला गैरहजर राहिल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चांनाही उधाण आलं, यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार संजय बनसोडे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली असून माध्यमांमध्ये बैठकीत वाद झाल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार व तथ्यहीन आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे एकसंघ असून, पक्ष बळकटीसाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहणार आहोत, असंही आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे.
आमदार संजय बनसोडे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काल मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सर्वांनी एकमताने ठराव मंजूर करत येणाऱ्या काळात सुनेत्रावहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच वहिनी जो निर्णय घेतील, त्यामागे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही देण्यात आली.