#

Advertisement

Wednesday, May 20, 2026, May 20, 2026 WIB
Last Updated 2026-05-20T14:33:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

Advertisement

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या समाधान हेल्पलाईन वर कॉल करुन महापौरांना धमकवण्यात आले आहे. आशिष जमदाडे-पाटील नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. ही व्यक्ती महापौरांना काही महिन्यांपूर्वी दोन वेळा भेटली होती. क्रीडा संबंधित काही काम घेऊन त्यांनी महापौरांची भेट घेतली होती. त्यानंतर आत्ता थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. भोसरी पोलिसांनी आशिष जमदाडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो मानसिक तणावात असल्याचे दिसून आले  त्यामुळे समज देऊन त्याला सोडण्यात आले, अशी माहिती महापौरांनी दिली.

महापौर रवी लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आशिष जामदाडे पाटील असे आहे. तो मूळचा छत्रपती संभाजी नगरचा असून सध्या चिखली परिसरात राहतो आणि भोसरी एमआयडीसीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी तपास केला असता, संबंधित तरुणाचा घटस्फोट झालेला असून तो आई-वडिलांपासून वेगळा राहतो. या कौटुंबिक वादामुळे त्याची मानसिक स्थिती खालावली असून, त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे निदर्शनास आले आहे. 

पोलिसांनी फोटो पाठवल्यानंतर महापौरांनी या व्यक्तीला ओळखले. रवी लांडगे यांनी सांगितले की, साधारण दोन वर्षांपूर्वी ही व्यक्ती त्यांना दोनदा घरी भेटायला आली होती. त्यांच्या आजीच्या निधनानंतर तेराव्याच्या कार्यक्रमालाही तो आला होता आणि त्याने महापौरांना एक पुस्तकही भेट दिले होते. तो स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असून त्या संदर्भातील कामासाठीच भेटला होता. त्या भेटीदरम्यान अतिशय चांगला संवाद झाला होता, त्यामुळे त्याने असे का केले याबद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.