#

Advertisement

Friday, May 15, 2026, May 15, 2026 WIB
Last Updated 2026-05-15T16:43:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण

Advertisement

दिल्ली : देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर वेगवेगळे दिसून आले. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६०,२४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला, तर मुंबई आणि कोलकातामध्ये हा दर सुमारे १,६०,०९० रुपये होता. चेन्नईमध्ये मात्र सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत अधिक राहिले असून ते १,६३,०९० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचले. लखनऊ, जयपूर आणि कानपूरमध्येही सोन्याचे दर दिल्लीच्या आसपासच राहिले.

बुलियन बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या किंमतींना अखेर ब्रेक लागल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः सोन्याच्या दरात तब्बल २,३८० रुपयांची घट झाली असून चांदीही मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे.  ४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १.६० लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत जवळपास १.४७ लाख रुपये प्रति १० ग्रॅम इतकी नोंदवली गेली. दुसरीकडे, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून प्रति किलो चांदीचा भाव १२,३६० रुपयांनी कमी होऊन २.७९ लाख रुपयांच्या खाली आला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही मौल्यवान धातूंमध्ये दबाव दिसून आला. जून डिलिव्हरीच्या सोन्याच्या करारामध्ये सुमारे ०.८७ टक्क्यांची घसरण झाली असून दर १,६०,५६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तर जुलै डिलिव्हरीच्या चांदीच्या करारामध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली.  सोन्याचे दर (१५ मे २०२६) पाहिले तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १६,०२७ रुपये इतका आहे. १० ग्रॅमसाठी ग्राहकांना सुमारे १,६०,२७० रुपये मोजावे लागत आहेत. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १४,६९१ रुपये असून १८ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १२,०२० रुपये प्रति ग्रॅमवर व्यवहार करत आहे. चांदीच्या दरांमध्येही मोठा फरक दिसून आला. शुद्ध ९९९ फाईन चांदीचा दर प्रति किलो २,७९,४०० रुपये आहे. स्टर्लिंग सिल्व्हर, कॉईन सिल्व्हर आणि जर्मन सिल्व्हरच्या किंमतींमध्येही घसरण झाली आहे.

बाजार तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव, डॉलरमधील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांकडून नफावसुली यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये ही घसरण झाली आहे. मात्र आगामी काळात जागतिक आर्थिक परिस्थिती, व्याजदरांबाबतचे निर्णय आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांवर पुढील दर अवलंबून राहतील. दरम्यान, लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने ग्राहकांकडून खरेदी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची घसरण ही ग्राहकांसाठी सोनं-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी मानली जात आहे.