#

Advertisement

Tuesday, May 12, 2026, May 12, 2026 WIB
Last Updated 2026-05-12T14:13:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मोदींच्या आवाहनानंतर शरद पवारांची ठाम भूमिका...!

Advertisement

वर्तविली अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे, अशी  मातब्बर राजकारणी आणि ज्येष्ठ नेते, शरद पवार यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेची ठरत आहे, पंतप्रधान आणि PMO कार्यालयाचा जाणीवपूर्वक उल्लेख करत पावर यांनी एक सूचक पोस्ट लिहिली आहे.  

ज्येष्ठ नेते, शरद पवार यांनी म्हटले आहे की, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. शरद पवारांची ही पोस्ट आणि या ओळीतील दुसऱ्या ओळीत असणारे 'दूरगामी परिणाम' हे शब्द परिस्थितीचं गांभीर्य अगदी स्पष्टपणे अधोरेखित करत आहेत. शिवाय जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य आणण्यासाठी सरकारनं परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा अशीच ठाम भूमिका पवारांनी मांडल्यामुळं आता एक अनुभवी राजकारणी म्हणून त्यांच्या सल्ल्यांचा विचार करत मोदी सर्वपक्षीय बैठक बोलवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.