#

Advertisement

Saturday, May 23, 2026, May 23, 2026 WIB
Last Updated 2026-05-23T18:20:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्याभिषेक सोहळ्यास चला रायगडावर... : शाहु शिक्षण संस्थेतर्फे भव्य आयोजन

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची माहिती 

सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी रवाना होणार असून, यासाठी विविध स्तरांवर नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देत दि. 6 जुन-शनिवार 2026 रोजी सकाळी रयतेचे राजे छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यास मानवंदनेसाठी उपस्थित राहण्यासाठी सर्व शिवभक्त मावळ्यांनी शुक्रवार दि. 5 जुन रोजी दामाजी पुतळ्याजवळ सकाळी 9 वाजता यावे. रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी जेवनाची व राहण्याची उतम सोय, शाहु शिक्षण संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. सर्वांनी खाली नमूद केलेल्या शिक्षकांकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे. 

यावर्षी राज्याभिषेक सोहळ्याबाबत शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून नागरिक, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवास, निवास, भोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

सोलापूर शहरातील विविध भागांतून प्रवासी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक शिवभक्त पारंपरिक भगवे फेटे, झेंडे आणि ढोल-ताशांसह उत्साहात सहभागी होणार आहेत. राज्याभिषेक सोहळ्यासाठी रवाना होणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी आणि मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या सहभागामागील मुख्य उद्देश आहे. राज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक क्षण नसून स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा दिवस असल्याने मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात शिवमय वातावरण निर्माण झाले असून, विविध भागांत भगवे ध्वज, फलक आणि घोषणांनी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आयोजकांनी नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी व्हावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.


येथे संपर्क साधावा : 

काटकर सर : 8766551721

यादव सर : 9860960331

गुंड सर : 8999546793

आनिल पवार सर : 9096843321


टिप - स्वखर्चाने येणाऱ्या शिवभक्तांची राहण्याची व जेवणाची सोय शाहू शिक्षण संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.

सूचना - 1 जुन पर्यंत नावे स्वीकारली जातील.