#

Advertisement

Saturday, May 23, 2026, May 23, 2026 WIB
Last Updated 2026-05-23T17:34:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरमध्ये भाजप, राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण ?

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नावची चर्चा

सोलापूर : विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूरमध्ये भाजपकडून उमेदवार कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यात प्रामुख्याने माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे रणजितसिंह शिंदे, माजी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून चर्चेत आलेल्या नावांपैकी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे ही नाव घेतले जात असल्याची चर्चा आहे. 

पालकमंत्री गोरे आणि माजी आ. राऊत यांनी विमानप्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गुरुवारी रात्री बार्शीमध्ये राऊत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केल्याची चर्चा सुरू आहे. तसेच राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. परंतु दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राऊत यांच्यासाठी बार्शी मतदारसंघ आहे, परंतु प्रशांत परिचारक यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ नसल्याने त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची रणनीती पाहता माढा लोकसभेत भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. 

माढा लोकसभेच्यादृष्टीने माढा किंवा पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ भाजपच्या संघटनात्मक दृष्टीने कमकुवत आहेत. त्यामुळे भाजप तिकडे लक्ष केंद्रित करण्याची दाट शक्यता आहे. तर याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची या मतदार संघावर चंगली पकड असल्याने त्यांचे ही नाव चर्चेत आहे.