#

Advertisement

Friday, May 15, 2026, May 15, 2026 WIB
Last Updated 2026-05-15T14:25:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड सापडला

Advertisement

पुण्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णीला अटक

पुणे : नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड सीबीआयच्या ताब्यात आला असून पी व्ही कुलकर्णी असे त्याचे नाव आहे. सीबीआयने कुलकर्णीला लातूरमधून ताब्यात घेतले असून तो एनटीएशी संबंधित असल्यासाचेही समोर आले आहे. 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याचे समोर आल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
नीट पेपरफुटीच्या प्रकरणात आतापर्यंत अनेकजणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. पण त्याचा मास्टरमाईंड आता सीबीआयच्या ताब्यात आला आहे. पी व्ही कुलकर्णी हा पुण्यात केमेस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून काम करायचा, अशी माहिती समोर आली आहे. कुलकर्णी हा एनटीएशी संबंधित असून त्यानेच पेपर फोडल्याची माहिती आहे. नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर आता लातूरही सातत्यानं सीबीआयच्या रडारवर आहे. दोन दिवसांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या तपास आणि चौकशीनंतर पी व्ही कुलकर्णीला ताब्यात घेण्यात आले आहे. कुलकर्णी हा चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाला असल्याची माहिती आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या तो संपर्कात असल्याचंही समोर आले आहे. याच धाग्यावरून सीबीआयचे पथक लातूरपर्यंत पोहोचले. त्यानंतर कुलकर्णीची सखोल चौकशी करण्यात आली. लातूरच्या कैलासनगर मधील कुलकर्णीच्या घराला सध्या कुलूप असून त्याचे कुटुंब पुण्यात राहत असल्याची माहिती आहे. सीबीआयचे दुसरे पथक अद्याप लातूरमध्ये ठाण मांडून आहे.
दरम्यान, लातूर मधील सुतमील परिसरातील खासगी क्लास चालकाच्या घरी सीबीआयनं 11 तास तपासणी केली. यावेळी क्लास चालकाच्या घरातून काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत.


21 जून रोजी पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा
नीटला पेपरफुटीचं ग्रहण लागल्याने जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले. त्यामुळे आता केंद्र सरकारने 21 जून रोजी पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. रद्द झालेल्या परीक्षेचं शुल्क विद्यार्थ्यांना परत दिले जाणार असून नव्याने होणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसंच विद्यार्थ्यांना कोणतंही परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार असल्याचं केंद्रीय शिक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.