#

Advertisement

Saturday, June 6, 2026, June 06, 2026 WIB
Last Updated 2026-06-06T13:36:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती" शॉर्टफिल्मला भरभरून प्रतिसाद !

Advertisement

 

ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, कु. वसुंधरा अजय साळुंखे यांच्या भूमिका

पुणे : ६ जून... इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला सुवर्णक्षण ! याच दिवशी रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला हक्काचा राजा मिळाला. पण..., शिवरायांनी राज्याभिषेक का केला ? या ऐतिहासिक घटनेमागे नेमकी काय भूमिका होती आणि यातून काय साध्य झाले ? याचे उत्तर आजही अनेकांना ठाऊक नाही. हाच गौरवशाली इतिहास आणि त्यामागील विचार उलगडण्यासाठी सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती, ही विशेष शॉर्टफिल्म तयार करण्यात आली आहे. ही शॉर्टफिल्म एकूण चार भागांमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहे. आज, ६ जून शिवराज्याभिषेक शुभमुहूर्तावर या फिल्मचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला, यामध्ये प्रमुख भूमिकेत ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे आणि त्यांच्या कन्या कु. वसुंधरा अजय साळुंखे यांनी भूमिका केल्या आहेत. शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचा हा अद्भुत विचार आणि इतिहास या शॉर्टफिल्मद्वारे मांडण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच कमेऱ्यासमोर येणाऱ्या कु. वसुंधरा यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपली भूमिका वठविली आहे, हा एक वेगळा आणि समाधान देणारा अनुभव होता असे वसुंधरा यांनी सांगितले.
दरम्यान,  छत्रपती संभाजीराजे यांनीही या शॉर्टफिल्मची विशेष दखल घेत काैतूक केले आहे. सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती या शॉर्टफिल्मला महाराष्ट्रातील  प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे, यु ट्यूबवर प्रसारित करण्यात आल्यानंतर अवघ्या काही तासांच राज्यभरातून या शॉर्टफिल्मला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे, याबद्दल ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.