#

Advertisement

Saturday, June 6, 2026, June 06, 2026 WIB
Last Updated 2026-06-06T17:14:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रायगड संवर्धनासाठी "शाहु संस्थे"ने उचलला खारीचा वाटा !

Advertisement

संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते ५१ हजारांचा धनादेश सुपूर्द 

किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदार, दलित, मागासवर्गीय आणि अठरापगड जातीच्या रयतेला सोबत घेऊन, कोणताही भेदभाव न करता न्यायाचे आणि समतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांच्या याच लोककल्याणकारी विचारांची उतराई म्हणून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याच जाणिवेतून या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून शाहू शिक्षण संस्थेच्या राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाकडून ५१ हजार रुपयांचा धनादेश संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते श्रीमंत संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी युवराज्ञी संयोगिताराजे यांच्या राज्याभिषेक सोहळा समितीकडे सुपूर्द करण्यात आला. हे धन शिवराज्याभिषेक सोहळा व स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पुनर्बांधणीच्या आणि संवर्धनासाठी शाहु संस्थेचा हा खारीचा वाटा उपयुक्त ठरेल, अशी भावना यावेळी प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केली, यावेळी संचालीका ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, अजय साळुंखे, वसुंधरा अजय साळुंखे, कु. जार्ज साळुंखे, स्वीय सहायक विशाल खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याभिषेक सोहळ्यात सहकुटुंब सहभाग : 
दरम्यान,  युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा शनिवारी (दि. 6) दुर्गराज रायगडवर उदंड उत्साहात पार पडला.  हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याने शिवकाळाचे दर्शन घडविले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शिवभक्त मोठ्या संख्येन सहभागी झाले होते. शाहु शिक्षण संस्थेने शिवभक्तांची प्रवास तसेच जेवण, अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे हे शाहु शिक्षण संस्थेच्या सहकुटुंब उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर तारखेनुसार 6 जूनला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. यावर्षीही हा सोहळा नेहमीच्या दिमाखात झाला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब, शहाजीराजे यांचे स्मरण करत हा सोहळा झाला. यावेळी संभाजीराजे, शहाजीराजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासूनच किल्ले रायगडावर विविध सांस्कृतिक शाहिरी, तसेच मैदानी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम झाले. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून किल्ले रायगडावर सुरू झालेल्या विविध कार्यक्रमांचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक करून संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्रातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.