#

Advertisement

Sunday, June 14, 2026, June 14, 2026 WIB
Last Updated 2026-06-15T04:09:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदार रोहित पवार यांच्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला बहुजन रयत परिषदेचा जाहीर पाठिंबा

Advertisement

पंढरपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी या मुख्य मागणीसह इतर महत्वपूर्ण मागण्या करीत येथे आमदार रोहित पवार यांनी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी  संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे- ढोबळे, प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष ना.म साठे, प्रदेश प्रवक्ते डॉ. मारुती लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी कसबे, सोमनाथ कांबळे, संदीप शिरसाट आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या  वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र यावेळी आमदार पॉवर यांना देण्यात आले.