#

Advertisement

Saturday, June 20, 2026, June 20, 2026 WIB
Last Updated 2026-06-20T13:37:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुप्रिया सुळेंची लेक आज लग्नाच्या बोहल्यावर चढणार

Advertisement

रेवती सुळे-सारंग लखानींच्या विवाह समारंभाला सुरुवात 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांची सोयरीक नितीन गडकरी यांच्या पुढाकारनं जमवण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी आता लग्नाची लगबग सुरू आहे. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरलं असून आज पुजेच्या कार्यक्रम पार पडला आहे. रेवती सुळे यांचे होणारे पती सारंग लखानी हे नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग हे एक यशस्वी उद्योजक असून 'विश्वराज ग्रुप'चे कार्यकारी संचालक म्हणून धुरा सांभाळतायत, तसेच ते क्रीडाप्रेमी आणि उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. सुळेंच्या लग्नघारत पुजेचा कार्यक्रम होता. त्याच पूजेचे फोटो समोर आले आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचे लग्न उद्योजक सारंग लखानी यांच्याशी जुळलंय. स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली होती. सुप्रिया सुळे यांची मैत्रीण स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर केले होते, त्यानंतर लग्नाची बातमी समोर आलेली. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी नेते मंडळींच्या घरी जात लग्नाची आमंत्रणं दिली.