Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा ॲड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी दिल्या शुभेच्छा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे विवाहबंधनात अडकणार आहेत. रेवती यांचा विवाह नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी होत असून, या आनंदाच्या सोहळ्याबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पावर यांचे निकटवर्तीय सहकारी आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा ॲड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी रेवती सुळे आणि सारंग लखानी या नवदांपत्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे की, “रेवती आणि सारंग यांच्या वैवाहिक जीवनाचा नवा प्रवास सुख, समृद्धी, यश आणि आनंदाने भरलेला असो. दोघांच्या सहजीवनात परस्पर विश्वास, प्रेम आणि जिव्हाळा वृद्धिंगत होत राहो. दोन्ही कुटुंबांचा स्नेह अधिक दृढ होऊन समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी सदिच्छा आहे.” सुळे आणि लखानी कुटुंबीयांच्या या आनंदोत्सवाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडूनही अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या आगामी वैवाहिक जीवनासाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
