#

Advertisement

Friday, June 5, 2026, June 05, 2026 WIB
Last Updated 2026-06-05T14:56:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंढरपुरात विठ्ठलाचं VIP दर्शन बंद, मग यांनी कसे घेतले ?

Advertisement

मंदिर व्यवस्थापनाला भाविकांचा सवाल 

पंढरपूर : अधिकमासाच्या निमित्ताने पंढरपुरात दररोज एक लाख भाविक येत आहेत.अशावेळी सामान्य भाविकांना सहज दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.असे जरी असले तरी आज दर्शन रांग थांबवून विधान परिषदेतील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना थेट विठ्ठल दर्शन घडवण्यात आले आहे. त्यामुळे नक्की व्हीआयपी दर्शन पंढरपुरात बंद आहे का?असा सवाल या निमित्ताने पुढे येत आहे.
पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवल्यामुळे सर्वसामान्य भाविकांची दर्शनाची वेळ तीन तासाने वाढली आहे.त्यामुळे भाविकांना सहज आणि सुलभ वेळेत दर्शन मिळते.अशातच सोलापूर विधान परिषद निवडणुकीमधील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी दर्शन रांगेतील भाविकांना काही क्षणासाठी थांबवण्यात आले होते.
राऊत यांनी दर्शन घेतले आणि फोटो काढले.सोशल मीडियावर प्रसिद्ध देखील केले.तसेच पंढरपुरात माध्यमांना माहिती देताना आपण विठ्ठल दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केल्याचे देखील राजेंद्र राऊत यांनी सांगितले.त्यामुळे सामान्य भाविकांना थांबवून राऊत यांना व्हीआयपी दर्शन दिले का? अशी चर्चा या निमित्ताने पुढे येत आहे.