Advertisement
पावसाळी अधिवेशन संपले : राज्य सरकार सुस्त
मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारचे यंदाच्या वर्षातील पावसाळी अधिवेशन पार पडले, मात्र यंदाही विरोधी पक्षनेतेपदी कोणाचीही निवड करण्यात न आल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. आता, पुढील अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपूरला होणार आहे. त्यामुळे, पुढील अधिवेशनापर्यंत तरी सरकारने विरोधी पक्षनेते पदी विरोधी पक्षातील नेत्याची निवड करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे.
महावविकास आघाडीत सर्वाधिक प्रतिनिधी असलेल्या पक्षाचा गटनेता म्हणून मी आहे, मी समन्वय ठेवला आहे. आमच्यात अंतर्गत वाद नाही. विरोधी पक्षनेत्यासंदर्भात बोलायचं तर सदस्य संख्या याची अट नाही, असं पत्र सचिवांकडून आपण घेतलं आहे. आम्ही तिघे मिळून चार-चार वेळा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. आता करायचं काय? अजून किती लाचारी करत त्यांच्या समोर यायचं? किती डोकं फोडायचं? असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला.
