#

Advertisement

Friday, July 10, 2026, July 10, 2026 WIB
Last Updated 2026-07-10T17:02:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Advertisement

महत्त्वाची अटच केली रद्द

मुंबई : सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात दिलासा देण्यात आला होता. पण 30 जूनची कर्जमाफीची डेडालाईन हुकली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असा दावा सरकारकडून केला जातो आहे. ही कर्जमाफी नेमकी कधी मिळणार याची तारिख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आज, सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकतरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. 50 हजारांची अट शिथील करत आता 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तर फक्त कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही आणि होऊ शकत नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळेल आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करतो, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जमाफीच्या निर्णयासाठी 2029 पर्यंत थांबू शकलो असतो मात्र आम्ही तसे केले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आता सभागृहात आज मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत माहिती दिली असली तरी कर्जमाफीसाठी सरकारने केंद्राकडून आयकर डेटा मागवलाय. केंद्राकडून  याबाबत माहिती आल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरु होणार असल्याचं कळतंय. आज मुख्यमंत्र्यांनी काही अटी शर्थी शिथिल केल्याने मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे,. पण प्रत्यक्ष फायदा तेव्हाच होईल जेव्हा कर्जमाफी अस्तित्वात येईल.