Advertisement
शरद पवारांनी घेतली अभिजित दिपकेची भेट
दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला वेग आला असून विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढल्यानंतर आंदोलक आणि दिल्ली पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची माहिती जाणून घेतली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
