#

Advertisement

Monday, July 27, 2026, July 27, 2026 WIB
Last Updated 2026-07-27T12:34:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उमरगा दणाणला : "आरक्षण उपवर्गीकरण", मातंग समाजाचा मोर्चा

Advertisement

माजी मंत्री लक्षमणराव ठोबळे, उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची अंदोलनात उपस्थिती

उमरगा: अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उप-वर्गीकरण लागू करण्याच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज उमरगा व लोहारा तालुक्याच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दोन्ही तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चासाठी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, आझाद क्रांती सेनचे राजेश भाऊ गोंडे, लहुजी शक्ती सेना राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्षा नागिनाताई कांबळे, आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते लक्ष्मण क्षिरसागर, प्रदेश अध्यक्ष लहुजी शक्ती सेना कैलास खंदारे आदिंसह विवीध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हुतात्मा स्मारकापासून 11 वाजता हा मोर्चा सुरु करण्यात आला. हाती विविध फलक आणि पिवळे ध्वज घेऊन आंदोलक मोर्चात सामील झाले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुण मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आरक्षण उप-वर्गीकरण लागू करण्याच्या समर्थनार्थ भाषणे केली. तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात सकल मातंग समाज, उमरगा, लोहारा तालुका मातंग समाजाच्या मागण्या निवेदनाद्वारे कळविण्यात आल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अनुसूचित जाती अंतर्गत उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे आम्ही पूर्ण समर्थन करतो. अति-वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे आरक्षण प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्वच जातींचा विकास समान झालेला नाही. उप-वर्गीकरणामुळे या प्रवर्गातील सर्वात मागास आणि वंचित राहिलेल्या घटकांना शासकीय सेवा आणि शिक्षणात योग्य वाटा व न्याय मिळेल. घटनेचा मुळ उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात अभिप्रेत ठेवलेला सामाजिक समतेचा आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा उद्देश या उपवर्गीकरणामुळे खर्‍या अर्थाने यशस्वी होईल, असे निवेदनात म्हंटले आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची राज्यात तातडीने अंमलबजावणी करावी आणि आरक्षणाचे न्याय्य उपवर्गीकरण अतिमागास घटकाना त्यांचा हक्क मिळवुन द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
यावेळी दिलीप गायकवाड, शिवाजी गायकवाड, संजय सरवदे बालाजी गायकवाड, विजय तोरडकर, राजूभाऊ शिंदे, अ‍ॅड. सुखदेव होळीकर, दिपक रोडगे, विशाल गायकवाड, सुधाकर बनसोडे, राम कांबळे, बबन बनसोडे, संजय कांबळे, मारूती क्षिरसागर, सतिश कांबळे, भाग्यश्री सुरवसे, नितीन शिंदे, माधव वाघमारे यांच्यासह सकल मातंग समाज, उमरगा, लोहारा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.